स्रोत

AdSense साठी तुमची साइट सर्वात चांगल्या प्रकारे फॉरमॅट कशी करायची

स्रोत इमेज
जाहिरात ऑप्टिमायझेशन

तुमची AdSense कमाई वाढवायची आहे? AdSense सोबत पैसे मिळवण्यासाठी तुमची साइट सर्वोत्तम स्थितीत आणण्याकरिता या चार टिपा पहा.

Google AdSense वापरून पैसे मिळवायचे असतील, तर तुमच्या साइटचा लेआउट म्हणजे सर्व काही आहे. तुमच्या जाहिराती आशयापेक्षा वरचढ होऊ नयेत. अतिथींना तुमचा आशयही पाहता येणार नाही इतक्या जाहिराती असू नयेत, नाहीतर कोणत्याही गोष्टीवर क्लिक करण्याचा मोह होण्याआधीच ते साइट सोडून जातील. परंतु तुम्ही तुमच्या जाहिराती आशा जागीदेखील ठेवू नयेत की, जेथे त्यांना त्या दिसणार नाहीत. म्हणूनच, तुमच्या वेबसाइटसाठी AdSense ऑप्टिमायझेशन महत्त्वाचे आहे. तसे करण्यासाठी येथे काही टॉप Google AdSense टिपा दिल्या आहेत.

१. लीडरबोर्ड बॅनरसाठी जागा तयार करा.

तुमच्या साइटच्या अतिथींचे लक्ष वेधून घेण्यासाठी पेजच्या सर्वात वर मोठे ग्राफिक असण्यासारखे चांगले दुसरे काहीही नाही. ज्यांना त्यांची AdSense कमाई ऑप्टिमाइझ करायची आहे अशा बहुतेक साइटसाठी, ते सुमारे ७२८ पिक्सेल रुंद आणि ९० पिक्सेल उंच लीडरबोर्ड बॅनर आहे. काही साइटसाठी ते त्यापेक्षा आणखी मोठे असू शकते.

लीडरबोर्ड बॅनरबद्दल उत्कृष्ट गोष्ट म्हणजे ते फक्त लोकांचे लक्षच वेधून घेत नाही, तर ते तुमच्या साइटसाठी जवळपास प्रतिष्ठेचा बॅज असल्यासारखे आहे. Time मासिकासारखी प्रकाशने कमाई करण्यासाठी काही वेळा त्यांच्या साइटच्या सर्वात वर मोठ्या जाहिराती वापरतात.

स्रोत एम्बेड केलेली इमेज

Entrepreneur सारखी इतर प्रकाशने काही वेळा त्यांच्या हेडरखाली साधारण लीडरबोर्ड बॅनर वापरतात.

तुमच्या अतिथींना तुमचा आशय झटपट अ‍ॅक्सेस करू देतानाच दोन्ही त्यांचे लक्ष लगेच वेधून घेतील, त्यामुळे AdSense कमाई जनरेट करण्यासाठी दोन्ही उत्कृष्ट पर्याय आहेत.

२. आयताकार किंवा स्कायस्क्रेपर बॅनरसाठी साइडबार ठेवा.

पुढील Google AdSense टीप म्हणजे तुमच्या साइटवर तुम्हाला अतिरिक्त बॅनर जोडता येण्यासाठी एक (किंवा दोन) साइडबार ठेवणे. तुम्ही सेट केलेल्या आकाराच्या आयताकार किंवा स्कायस्क्रेपर बॅनरमधून निवडू शकता किंवा तुमच्या अतिथीच्या डिस्प्लेच्या आकारासोबत फ्लो होणारे प्रतिसादात्मक बॅनर निवडू शकता.

AdSense ऑप्टिमायझेशनपेक्षा वेगळे, तुमच्या साइटचे अतिथी ईमेल किंवा सोशल नेटवर्कमार्फत तुम्हाला फॉलो करणे कसे सुरू ठेवू शकतील याबद्दलची माहिती दाखवण्यासाठी तुम्ही तुमचा(चे) साइडबार वापरू शकता. यामुळे ते परत येतील आणि त्यांना वेगवेगळ्या जाहिरातींवर क्लिक करण्याची संधी मिळेल याची खात्री होईल.

३. तुमच्या मुख्य हेडरखाली लिंक युनिटसाठी जागा शोधा.

लोकांनी क्लिक करावे म्हणून तुमच्या AdSense लिंक म्हणजे नेव्हिगेशन मेनू आहेत असे लोकांना वाटायला लावणारी कोणतीही फसवणूक तुम्ही करू शकत नाही. परंतु ब्लॉग आणि बातम्या साइटसाठी तुमच्या आशयाच्या मुख्य हेडरखालील लिंक युनिट सहसा चांगल्या प्रकारे एकजीव होतात, परंतु तरीही तुम्ही पारंपरिक लिंक रंगयोजना, किंवा तुमच्या साइटच्या थीमशी जुळणारी रंगयोजना वापरल्यास पुरेशी उठून दिसतात.

४. तुमच्या आशयाच्या मध्यभागी किंवा शेवटी आडवे बॅनर जोडा.

तुमच्या आशयाने तुमच्या अतिथींचे लक्ष वेधून घेणे सुरू केल्यावर तुम्हाला दोन ठिकाणी आडवे बॅनर ठेवता येतील. आशयाच्या शेवटी जाण्यासाठी त्यांच्याकडे कारण नसल्यास (जसे की चर्चा किंवा टिप्पणी बॉक्स), ते आशयाच्या मध्यभागी ठेवा. ते कदाचित त्यांना बेसावध गाठेल आणि तुमच्यासाठी क्लिक मिळवेल.

तुमच्याकडे खूप प्रतिबद्धता आणि चर्चा मिळवणारी साइट असल्यास, ते शेवटी ठेवा. शक्यतो त्यांची टिप्पणी पोस्ट केल्यानंतर अतिथी जेथे पोहोचतात तेथे, कारण तसेदेखील ते त्या वेळी तुमची साइट सोडून जाण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यांना पुढे जाण्यासाठी चांगले ठिकाण दिलेले बरे.