स्रोत

तुमची AdSense कमाई वाढवण्यासाठी तुमची साइट सर्वोत्तम स्थितीत कशी आणायची

स्रोत इमेज
जाहिरात ऑप्टिमायझेशन

तुमची AdSense कमाई वाढवायची आहे? AdSense सोबत पैसे मिळवण्यासाठी तुमची साइट सर्वोत्तम स्थितीत आणण्याकरिता या चार टिपा पहा.

Google AdSense मार्फत पैसे मिळवण्यासाठी साइट सुरू करण्याचा बेत आखत आहात किंवा तुमची Google AdSense कमाई कशी वाढवायची याचा विचार करत आहात? तसे असल्यास, AdSense मधून बरेच काही मिळवण्यासाठी आणि तुमची कमाई वाढवण्यासाठी तुमची साइट सर्वोत्तम स्थितीत कशी ठेवायची याबाबत येथे काही टिपा दिल्या आहेत.

१. युनिक, मौल्यवान आशय तयार करा.

सुरुवात म्हणून, Google AdSense कडून तुमच्या साइटला आधी मंजुरी दिली जाऊ शकते, परंतु नंतर तिचे गुणवत्ता हमीसाठी परीक्षण केले जाऊ शकते. दुसर्‍या शब्दांत, १०० पेज अनुक्रमित करण्यासाठी आणि त्यांवरून कमाई करण्यासाठी तुम्ही तुमची साइट कमी गुणवत्तेच्या आशयाने भरून टाकू शकत नाही.

त्याऐवजी, तुम्हाला ज्याबद्दल विशेष आवड आहे अशी एखादी गोष्ट शोधा आणि त्याच गोष्टीबद्दल विशेष आवड असणारे इतर लोक शोधा. त्यानंतर त्या विषयाबद्दल विशेष आवड असलेल्या लोकांना वाचायला आवडेल अशा प्रकारचा आशय तयार करण्यासाठी त्यांच्यासोबत एकत्र काम करा.

२. तुमची साइट रोचक बनवा.

तुमच्या वेबसाइटवरचे अतिथी कदाचित लगेच तुमच्या AdSense जाहिरातींवर क्लिक करणार नाहीत आणि फक्त एकच पेज पाहून ते निघून गेल्यास, तुम्ही त्यांना आणि त्यांच्याकडून होणार असलेल्या संभाव्य AdSense कमाईला कायमचे गमावले असू शकते. त्यामुळेच तुम्ही रोचक असलेली साइट तयार केली पाहिजे.

याचा अर्थ असा की, तुमच्या साइटवर येणार्‍या प्रत्येक अतिथीला साइटमध्ये आणखी खोलवर जावे असे वाटले पाहिजे याची तुम्ही खात्री केली पाहिजे. हे करण्याचे बरेच मार्ग आहेत. सुरुवात म्हणून, अतिथींना सर्वोत्तम भाग शोधता यावेत यासाठी तुमच्या साइटच्या वरच्या बाजूला स्पष्ट नेव्हिगेशन ठेवा.

त्यानंतर, आशयाचा प्रत्येक भाग आशयाच्या आणखी भागांशी लिंक करत आहे याची खात्री करा. त्यामुळे, तुमचे अतिथी ज्या पेजवर गेले आहेत ते त्यांना आवडत नसल्यास, त्याऐवजी ते त्यांना रस असू शकणार्‍या दुसर्‍या विषयाची लिंक पाहू शकतात.

शेवटी, साइडबारमध्ये आणखी आशय लिंक ठेवा. तुमचा सर्वात लोकप्रिय आशय कोणता आहे, तुमचा सर्वात जास्त शेअर केला गेलेला आशय कोणता आहे आणि तुमच्या कोणत्या आशयावर सर्वात जास्त टिप्पण्या दिल्या गेल्या आहेत ते तुमच्या अतिथींना कळू द्या. आशयाचे ते ठरावीक भाग एवढे लोकप्रिय का आहेत त्याबद्दल अतिथींना उत्सुकता असेल आणि त्यामुळे ते तुमच्या साइटवर आणखी जास्त वेळ राहतील. आणि जितक्या जास्त वेळा तुमची पेज लोड केली जातील तितक्या जास्त जाहिराती त्यांना दिसतील, ज्यामुळे आणखी संभाव्य Google AdSense कमाई केली जाऊ शकते.

३. तुमच्या अतिथींना तुमच्या साइटवर परत नेणारी आणखी चॅनेल द्या.

तुमच्या अतिथींना तुमच्या साइटचा विसर पडू देऊ नका. तुम्हाला फॉलो करता यावे यासाठी अतिथी तुमच्यासोबत कनेक्ट करू शकतील अशी एकाहून अधिक चॅनेल समाविष्ट करण्यासाठी तुमचा हेडर, साइडबार, आशयाचा शेवट आणि फूटर या सर्वात योग्य जागा आहेत. तुम्ही ईमेल निवड आणि सोशल नेटवर्क यांसारखे पर्याय समाविष्ट केले पाहिजेत. त्यामुळे, प्रत्येक वेळी तुम्ही आशयाचा भाग निर्माण करता किंवा त्याचा प्रचार करता तेव्हा, तुम्ही तुमच्या अतिथीला तुमच्या साइटबद्दल आठवण करून देऊ शकता आणि त्यांनी परत तुमच्या आणखी AdSense जाहिरातींवर शक्यतो क्लिक कराव्या अशी आशा करू शकता.

४. तुमचा वापरकर्ता अनुभव ऑप्टिमाइझ करा.

अनेक साइट मालकांना ज्या एका गोष्टीचा त्रास होतो ती म्हणजे वापरकर्ता अनुभव. तुमच्याकडे सर्वोत्कृष्ट आशय आणि सर्वोत्तम जाहिरातीचे स्थान नियोजन असू शकते, परंतु तुमची साइट मोबाइल डिव्हाइसवर लोड होत नसल्यास किंवा हळू लोड होत असल्यास, तुमच्या खूप अतिथींना तुमचा आशय वापरण्याची किंवा तुमच्या जाहिरातींवर क्लिक करण्याची संधी मिळण्याच्या बरेच आधी तुम्ही त्यांना गमावू शकता.

त्यामुळे तुम्ही तुमच्या साइटसाठी एकदोन गोष्टी करणे अत्यावश्यक आहे. तुमची साइट मोबाइल वापरकर्त्यांसाठी चांगले काम करते आणि झटपट लोड होते याची खात्री करण्यासाठी प्रथम, Google सोबत माझ्या साइटची चाचणी वापरून काही सोप्या चाचण्या घ्या. तुमच्या साइटमध्ये काही समस्या असल्यास, ही दोन्ही टूल त्या तुम्हाला दाखवतील जेणेकरून तुम्ही त्या सोडवू शकाल.

दुसरी गोष्ट, तुम्ही आधीच तसे केले नसल्यास, Google Analytics आणि Google Search Console साठी साइन अप करा. Google Analytics तुम्हाला ट्रॅफिक पातळ्यांवर नजर ठेवू देईल, त्यामुळे तुम्हाला घट दिसल्यास, तुम्ही त्यामध्ये लगेच लक्ष घालू शकाल. Google Search Console मध्ये टूलचा विस्तृत समुच्चय आहे जो तुमच्या वेबसाइटमध्ये तुमच्या अतिथींसाठी समस्या निर्माण करू शकेल अशा काही परफॉर्मन्स समस्या किंवा इतर एरर आहेत का हे शोधण्यात तुम्हाला मदत करेल.