स्रोत

वेबसाइट कशी तयार करायची

स्रोत इमेज
सर्वोत्तम पद्धती

तुमची आवड शेअर करणे, समुदाय तयार करणे किंवा तुमच्या व्यवसायाचा प्रचार करणे यांपैकी कोणत्याही बाबतीत, तुम्हाला स्वतःच्या वेबसाइटची गरज असू शकण्याची बरीच कारणे आहेत.

ती कशी दिसेल आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये व आशय दाखवायचा आहे याबद्दल तुम्ही कदाचित आधीच विचार करत असाल.

मात्र, सुरुवात करण्यापूर्वी, आपण यामधील काही प्रमुख पायर्‍या, सुरुवात कशी करायची आणि तुमची कल्पना प्रत्यक्षात कशी आणायची ते पाहू या.

तुमचे उद्दिष्ट निश्चित करून सुरुवात करा

तुमच्या वेबसाइटचा प्रमुख उद्देश काय आहे? तो प्रामुख्याने ब्लॉगिंग असल्यास, त्याचा तुम्हाला हव्या असलेल्या लेआउटच्या प्रकारावर आणि नेव्हिगेशनवर खूप परिणाम होईल. किंवा ती उत्पादने अथवा सेवांच्या विक्रीसाठी वापरण्याचा तुमचा विचार असल्यास, तुम्हाला सुरक्षित, नेव्हिगेट करण्यासाठी सुलभ आणि नवीन इन्व्हेंटरीने अपडेट करण्यास सोपे असे काही लागेल.

बजेट काळजीपूर्वक तयार करा

वेबसाइट तयार करण्याच्या किमती शून्यापासून हजारोपर्यंत असतात. प्रत्यक्षात ती साइटचा तुम्हाला हवा असलेला प्रकार आणि त्यासोबत काय साध्य करण्याचा तुमचा विचार आहे यावर अवलंबून असते.

तुम्हाला साधी ब्लॉगिंग साइट हवी असल्यास, निवडण्यासाठी बरीच विनामूल्य टूल आणि पर्याय आहेत. बहुतांश टूल आणि पर्याय वापरण्यास सोपे व आकलनसुलभ असतात, त्यामुळे तुम्हाला डिझाइन किंवा कोडिंगसंबंधी कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नसते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, तुमची साइट अगदी थोड्या काळात तयार होऊन काम करू लागेल, तसेच तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वेबसाइट डिझायनर किंवा डेव्हलपरवर पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

योग्य वेबसाइट प्लॅटफॉर्म निवडा

बहुतांश लोकांकडे त्यांची स्वतःची वेबसाइट अगदी सुरुवातीपासून तयार करण्यासाठी वेळ किंवा नैपुण्य नसते – आणि तेथेच वेबसाइट बिल्डरचे काम असते. तुमच्यासाठी सर्व कोडिंग केले जाते, त्यामुळे तुम्हाला फक्त टेंप्लेट निवडावी लागते, त्यानंतर तुमचा स्वतःचा मजकूर, इमेज वापरून आणि फिनिशिंग टच देऊन ती कस्टमाइझ करावी लागते.

कोणता वेबसाइट बिल्डर निवडायचा ते ठरवणे हा बहुधा त्याबद्दलचा सर्वात कठीण भाग असावा. शेकडो पुरवठादार उपलब्ध आहेत आणि पहिल्या नजरेत ते सर्व एकच किंवा अगदी सारख्याच सेवा देऊ करत असल्याचे दिसते.

पुरवठादार निवडण्यापूर्वी, प्रथम स्वतःला पुढील प्रश्न विचारा:

  • त्यामध्ये सुरक्षित URL किंवा ती नंतर जोडण्याचा पर्याय आहे का?
  • तो वापरण्यास आकलनसुलभ आहे का?
  • तुम्ही तो तुमच्या आवश्यकतांनुसार सहजपणे कस्टमाइझ करू शकता का?
  • यासाठी किती शुल्क द्यावे लागेल? ते एकदाच देण्याचे शुल्क आहे की मासिक शुल्क?
  • निवडण्यासाठी भरपूर टेंप्लेट आहेत का?
  • ते तांत्रिक सपोर्ट देऊ करतात का? तो विनामूल्य आहे का? तो ईमेल, फोन किंवा चॅटबॉटमार्फत आहे का?
  • ते व्हिडिओ किंवा बातमीपत्रक साइन अप कॅप्चर करणे यांसारखी प्लगिन अथवा एक्स्टेंशन देऊ करतात का?

पुन्हा, साइट कशासाठी वापरण्याचा तुमचा विचार आहे यावर बरेच काही अवलंबून असते. Google Blogger सारखी टूल उपयुक्त असू शकतात आणि तुम्हाला वेगवेगळ्या टेंप्लेट आणि डिझाइनच्या शैलींमधून निवडू देतात. लहान व्यवसाय, इव्हेंटचा प्रचार करण्यासाठी किंवा कामाचा पोर्टफोलिओ दाखवण्यासाठी, Google Sites हादेखील एक उत्कृष्ट मार्ग आहे. या झटपट मार्गदर्शक मध्ये आणखी माहिती आहे आणि त्यामुळे तुम्हाला निर्णय घेण्यात मदत होईल.

तुमचे डोमेन नेम सेट करा

अनेक विनामूल्य वेब बिल्डर टूल तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डोमेन नेमवर पैसे खर्च करावे न लागता साधा ब्लॉग तयार करू देतात. तुम्ही ब्लॉगिंगबद्दल गंभीर असल्यास किंवा तुमची वेबसाइट व्यवसायासाठी असल्यास, तुमच्याकडे देऊ करण्यासाठी काहीतरी आणखी कस्टमाइझ केलेले व विशेष असावे लागेल.

कोणता टॉप-लेव्हल डोमेन (TLD) निवडायचा हा विचारदेखील तुम्हाला करावा लागेल. उदाहरणार्थ, तुमची वेबसाइट विशिष्ट प्रदेश किंवा देशावर लक्ष केंद्रित करत असल्यास, तुम्ही .uk, .fr, .de, वगैरे निवडू शकता. किंवा ती अधिक जागतिक असल्यास, तुम्ही .com अ‍ॅड्रेसला प्राधान्य देऊ शकता.

TLD निवडताना विचारात घेण्याच्या इतर गोष्टी:

  • वाढत्या शुल्कांवर लक्ष ठेवणे. काही पुरवठादार सुरुवातीला सवलतीचे दर देऊ करतात, नंतर ते वाढवतात.
  • तुमचे डोमेन नेम आधीच ट्रेडमार्क केलेले नाही याची खात्री करा. तुमचे नाव दुसर्‍या ब्रँडच्या कॉपीराइटचे उल्लंघन करत असल्यास, तुम्हाला ते बदलणे भाग पाडले जाऊ शकते आणि कायदेशीर शुल्के भरावी लागू शकतात. त्याबद्दल अधिक माहिती येथे मिळवा.
  • तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा. तुम्ही डोमेनसठी साइन अप करता तेव्हा तुम्हाला ICANN ला तुमचे तपशील पुरवावे लागतात, जे स्पॅमर आणि घोटाळेबाज सहज अ‍ॅक्सेस करू शकतात. तुम्ही तुमचे तपशील खाजगी करणे निवडू शकत असलात तरीही, काही रजिस्ट्रार या सेवेसाठी शुल्क आकारतील, त्यामुळे आधी खात्रीपूर्वक तपासा.

तुमचे डोमेन नेम निवडताना, Google Domains हे सुरुवात करण्यासाठी चांगले ठिकाण असू शकते. ते कोणते डोमेन नेम उपलब्ध आहे, त्याचे शुल्क किती आहे हे झटपट दाखवते आणि काही फायदे किंवा संभाव्य दोषदेखील निर्देशित करते – उदाहरणार्थ, ते उच्चारण्यासाठी कठीण आहे का किंवा सहज चुकीचे ऐकले जाऊ शकते का.

तुमचा आशय तयार करणे

तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म निवडला आहे, तुम्ही तुमचे डिझाइन प्लॅन केले आहे आणि आता एक रोचक गोष्ट करण्याची वेळ आहे: तुमच्या वापरकर्त्यांना आवडेल असा आशय तयार करणे. पुन्हा, काही मूलभूत तत्त्वे फॉलो केल्याने तुमचा वेळ आणि पैसे वाचवण्यात तुम्हाला मदत होते व तुमच्या अतिथींना आणखी बरेच काही मिळवण्यासाठी परत येण्यास प्रोत्साहन मिळते.

या महत्त्वाच्या टिपा वापरून पहा.

  • लोक काय शोधत आहेत आणि ठरावीक शब्दांची किंवा वाक्यांची लोकप्रियता काळानुसार कशी बदलते हे पाहण्याचा Google Trends हा उपयुक्त मार्ग आहे. वेगवेगळ्या प्रदेशांत तुमच्या आशयामध्ये असलेल्या स्वारस्याचे तुम्ही मापनदेखील करू शकता आणि जगभरातील संभाव्य नवीन प्रेक्षक ओळखू शकता. विसरू नका, मतचाचण्या घेण्यासाठी आणि काय ट्रेंड होत आहे किंवा नवीन येत आहे हे जाणून घेण्यासाठी, तुम्ही कधीही तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा इतर ऑनलाइन समुदाय गट वापरू शकता.
  • आशय जनरेट करणे सुरू करण्यापूर्वी, तो किती वेळा प्रकाशित करण्याचा तुमचा विचार आहे ते ठरवा आणि त्यावर कायम रहा. लक्षात ठेवा, गुणवत्ता ही प्रत्येक वेळी संख्येपेक्षा श्रेष्ठ असते.
  • लक्षात ठेवा, प्रत्येकाला आशय एकाच प्रकारे वापरणे आवडेल असे नाही. काही जण साध्या मजकुराला प्राधान्य देतात, तर इतरांना इंफोग्राफिकचा वेग किंवा व्हिडिओची सुलभता आवडते. कालांतराने, सर्वोत्तम प्रतिसाद कशाला मिळतो हे तुम्हाला कळेल.
  • तुम्ही आशय प्रकाशित करणे सुरू केल्यावर, तुमचे अतिथी कुठून येतात, ते तुम्हाला कसे शोधतात आणि कोणती पेज सर्वाधिक लक्ष वेधून घेतात हे तुम्हाला जाणून घ्यावे लागेल. तसे करण्यासाठी, Google Analytics वापरणे हा एक मार्ग आहे, जे तुम्ही रीअल-टाइम परिणामांसाठी तुमच्या ब्लॉगशी थेट लिंक करू शकता.
  • हा मार्गदर्शक तुमच्या अतिथींसाठी आशय तयार करण्यासंबंधी आणखी टूल आणि टिपा, तसेच जगभरातील प्रेरणादायक यशोगाथा शेअर करतो.

तुमची स्वतःची वेबसाइट असणे हा तुमच्या प्रेक्षकांशी कनेक्ट करण्याचा आणि तुमची वैयक्तिक व व्यावसायिक ध्येये साध्य करण्याचा मजेशीर आणि फलदायी मार्ग असू शकतो. या मार्गदर्शकामधील टूल आणि टिपा सुरुवात करण्यात आणि महागड्या चुका टाळण्यात तुम्हाला मदत करतील, तसेच तुमच्या ऑनलाइन उपस्थितीमधून कमाई करण्याचे मार्ग एक्सप्लोर करण्यासाठी व तुमच्या वापरकर्ता अनुभवामध्ये सुधारणा करणे यासाठी, तुम्ही आमचे स्रोत केंद्रदेखील वापरू शकता.