स्रोत
तुमच्या वेबसाइटच्या ट्रॅफिकमध्ये वाढ कशी करायची
नवीन ट्रॅफिक म्हणजे कोणत्याही वेबसाइटची जीवनधारा असते आणि तुमची पोहोच वाढवण्यासाठी, तसेच आणखी ऑनलाइन अतिथी आकर्षित करण्यासाठी तुम्हाला वापरता येणारी काही शून्य शुल्क धोरणे आपण या लेखामध्ये एक्सप्लोर करणार आहोत.
मात्र, सुरुवात करण्यापूर्वी, तुम्हाला आणखी ट्रॅफिक का हवे आहे याबाबत तुमचे विचार स्पष्ट असणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या समुदायामध्ये वाढ करायची आहे का? आणखी उत्पादने विकायची आहेत का? सामाजिक उपक्रम राबवायचा आहे का? उदाहरणार्थ, सामाजिक उपक्रम राबवायचा असल्यास, ज्या खरेदीदारांना पैसे खर्च करायचे आहेत आणि गोष्टी खरेदी करायच्या आहेत त्यांना आकर्षित करण्यात फारसा अर्थ नाही, कारण ते लवकरच निराश होतील व निघून जातील.
तुमच्या ध्येयांबाबत तुमचे विचार स्पष्ट असल्यावर, साइटचा प्रचार करून ट्रॅफिक वाढवणे सुरू करण्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयार असाल.
सामान्यतः, वेबसाइटचा प्रचार तीन वर्गवार्यांमध्ये विभाजित केला जाऊ शकतो:
सशुल्क प्रचार म्हणजे तुम्ही इतर प्लॅटफॉर्म किंवा वेबसाइटवर (उदा., तुम्ही Google Ads वापरत असल्यास, Google शोध पेज) जाहिरात करण्यासाठी पैसे देता तेव्हा.
मालकीचे प्रचार म्हणजे तुम्ही बातम्या आणि ऑफरसह कधीकधी संपर्क साधत असलेल्या ईमेल सदस्यांची सूची असू शकते.
कमावलेले प्रचार म्हणजे तुमच्या साइटशी लिंक होणार्या इतर वेबसाइट – जसे की तुमचा उल्लेख करणारा दुसरा ब्लॉग किंवा वृत्तपत्रातील लेख.
काही पद्धती तिन्ही वर्गवार्यांच्या अंतर्गत येतात. उदाहरणार्थ, तुमच्या बातम्या/उपक्रम/उत्पादने यांचा इतर वापरकर्त्यांकडे प्रसार करण्यासाठी तुमच्या फॉलोअरना प्रोत्साहन देणार्या, सोशल मीडियातील सशुल्क जाहिराती. मात्र, तिन्ही वर्गवार्या लोकांना आकर्षित करणार्या आणि त्यांना पुनःपुन्हा परत आणणार्या उत्कृष्ट आशयावर विसंबून असतात.
उत्कृष्ट आशयाची गुरुकिल्ली
गुंतवून ठेवणारा आशय तुम्ही काही वेगवेगळ्या मार्गांनी तयार करू शकता. तुम्ही खाद्यपदार्थांसारख्या एखाद्या विशिष्ट विषयावर लिहिणारे ब्लॉगर असल्यास, स्थानिक शेफ सुट्टीतील त्यांचा आवडता पदार्थ कसा बनवतात याबाबत त्यांच्या मुलाखती घेणे हा एक पर्याय असू शकतो. किंवा तुम्ही वेडिंग प्लॅनर असल्यास, लोकांना संदर्भ घेता येईल असा खास आशय किंवा आकडेवारी तयार करू शकता – जसे की पुढील वर्षी अपेक्षित असलेल्या विवाहांची संख्या किंवा वधूच्या मेकअपबाबत नवीन ट्रेंड. तुम्ही Twitter मतचाचणीदेखील घेऊ शकता आणि तुमचे निष्कर्ष प्रकाशित करू शकता.
तुमचा दृष्टिकोन कोणताही असो, तुमचा आशय दृश्य रूपात गुंतवून ठेवणारा आणि आत्मसात करण्यास सोपा असल्याची खात्री केल्याने, त्याचा आनंद घेण्यास व तो शेअर करण्यास जास्त लोकांना प्रोत्साहन मिळेल. तसेच लक्षात ठेवा, तुम्ही तुमची साइट नवीन आशयासह अपडेट केल्यावर, तुमच्या जुन्या आशयावर खात्रीपूर्वक लिंक जोडा आणि सुसंगत असल्यास, त्याउलट करा. दर्जेदार आशय तयार करणे यासंबंधी येथे आणखी काही टिपा दिल्या आहेत.
ट्रॅफिकमध्ये वाढ करण्याचे मार्ग
आता तुमचा आशय तयार असल्यावर, तो योग्य प्रेक्षकांपुढे कसा आणायचा ते येथे दिले आहे.
१. ऑरगॅनिक सोशल मीडिया
तुमचे प्रेक्षक तयार करण्याचा आणि ट्रॅफिकला चालना देण्याचा हा अत्यंत परिणामकारक मार्ग असू शकतो. संशोधन करणे आणि तुमचे प्रेक्षक सर्वाधिक वापरत असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शोधणे ही याची गुरुकिल्ली आहे. तुमच्या सध्याच्या ग्राहकांना किंवा समुदायाला विचारून अथवा फक्त Google शोध करूनदेखील तुम्ही हे करू शकता. लोकांना आवडणारे आशयाचे प्रकार आणि तो मिळवण्यासाठी ते सामान्यतः कुठे जातात त्याच्याशी तुम्ही लवकरच परिचित व्हाल. उदाहरणार्थ, तुम्ही विणकामासंबंधी ब्लॉग चालवत असल्यास, नवीन टिपांसाठी ते YouTube वर विसंबून असल्याचे किंवा त्यांच्या नवीनतम निर्मितीची Instagram वर चर्चा करत असल्याचे तुम्हाला दिसेल.
तुम्ही सोशल मीडियामध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवल्यास, तुम्ही सातत्यपूर्ण पोस्टिंग शेड्युल स्थापित करत असल्याची आणि तुमचा आशय प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी अनुकूल करत असल्याची खात्री करा. उदाहरणार्थ, Twitter सोबत तुम्हाला तुमच्या पोस्ट २८० वर्णांपर्यंत मर्यादित कराव्या लागतील. YouTube Shorts हेदेखील व्हिडिओ ६० सेकंदांपर्यंत मर्यादित करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आशय शक्य तितका आकर्षक बनवणे. म्हणून, फक्त साधा मजकूर पोस्ट करण्यापेक्षा, लोक स्क्रोल करत असताना त्यांची नजर वेधून घेणारे आणि त्यांना ते शेअर करण्यास प्रोत्साहन देणारे साधे ग्राफिक तयार करणे अधिक उत्तम असेल.
याच्याशी संबंधित गोष्ट म्हणजे, सोशल मीडियामार्फत शेअर केल्यावर तुमची साइट कशी दिसावी यावर परिणाम करण्यासाठी, नेहमी सोशल मीडिया मेटा टॅग वापरा. त्याबद्दल येथे आणखी माहिती मिळवा.
शेवटचे, पण महत्त्वाचे, संकोच करू नका. लोक तुमच्या आवडीच्या किंवा तुमचे ज्यामध्ये नैपुण्य आहे अशा एखाद्या विषयाची चर्चा करत असल्यास, त्यामध्ये सहभागी व्हा आणि तुमचे विशेष आकलन मांडा.
२. ईमेल सूची
तुमच्या साइटची वाढ होईल, तसतसे वापरकर्त्यांशी संपर्कात राहण्यासाठी त्यांचे ईमेल अॅड्रेस विचारणे तुम्हाला विचारात घ्यावे लागू शकते. मात्र, सुरुवात करण्यापूर्वी, लोकांना मोबदल्यात विनामूल्य मार्गदर्शक, खास ऑफर किंवा फक्त तुमच्या बातम्यांचा मासिक आढावा यांपैकी काय मिळेल हे त्यांना दाखवणे महत्त्वाचे आहे.
तुम्ही काहीही देऊ करणे ठरवले, तरी तुमच्या आशयाची शैली आणि वारंवारता यांबाबत नेहमी सातत्यपूर्ण रहा आणि तुमच्या ईमेलमध्ये कॉल टू अॅक्शन बटणांचा स्पष्टपणे समावेश करणे लक्षात ठेवा. आणखी एक महत्त्वाची टीप: तुमच्या प्रेक्षकांना कधीही स्पॅम करू नका. ते काही देश यांमध्ये बेकायदेशीर आहे एवढेच नाही, तर त्यामुळे प्रेक्षक नाराज होण्याची आणि त्यांना सदस्यत्व रद्द करावेसे वाटण्याची शक्यता आहे.
३. शोध इंजीन ऑप्टिमायझेशन (SEO)
SEO हे उपयुक्त टूल आहे, जे तुम्हाला शोध इंजीन परिणामांमध्ये आणखी वर दिसण्यात आणि नवीन ट्रॅफिक जनरेट करण्यात मदत करू शकते. ताजा आणि गुंतवून ठेवणारा आशय तयार करणे ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली असेल आणि सुरुवात करण्यासाठी Google Trends ही उत्तम जागा आहे. एखाद्या विषयाच्या शोधामधील स्वारस्य काळानुसार कसे बदलले आहे आणि लोक इतर कोणती संबंधित वाक्ये व शब्द (उदा. “योगनिद्रा” किंवा “हॉट योगा”) शोधतात हे पाहण्यासाठी फक्त तुम्ही लक्ष केंद्रित करत असलेले क्षेत्र (उदा. “योग”) टाइप करा. त्यानंतर तुम्ही या संज्ञांभोवती तुमच्या लेखांची किंवा ब्लॉगची रचना करू शकता, जेणेकरून लोक ऑनलाइन शोधत असताना तुमची वेबसाइट दिसण्याची जास्त शक्यता असेल.
येथे एक महत्त्वाची टीप म्हणजे तुमची साइट Google आणि इतर शोध इंजीन क्रॉल व अनुक्रमित करू शकतील अशा प्रकारे सेट केली असल्याची खात्री करणे. हा SEO स्टार्टर मार्गदर्शक वापरा किंवा आमचे मागणीनुसार वेबिनार पहा. तुम्ही प्रकाशक असल्यास, आम्ही हे वेबिनार याचीदेखील शिफारस करतो, जे मोबाइल साइट, पेजनुसार विभागणी, डुप्लिकेट आशय आणि बरेच काही पाहते.
तुमची साइट आणखी लोकप्रिय होईल, तसतसे तुम्ही विदेशी बाजारपेठांमध्ये विस्तार करून ट्रॅफिक मिळवण्याचा प्रयत्नदेखील करू शकता आणि या नवीन प्रक्षकांसाठी तुमचा आशय लोकलाइझ कसा करायचा ते हा मार्गदर्शक दाखवतो.
४. विनामूल्य PR
तुम्हाला वापरून पाहता येणारा दुसरा मार्ग म्हणजे विनामूल्य प्रसिद्धी. सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला प्रेस रिलीझ तयार करावी लागेल. जोपर्यंत तुम्ही त्यामध्ये स्वतःचे विशेष मत किंवा दृष्टिकोन जोडता, तोपर्यंत तो तुमच्या प्रेक्षकांना स्वारस्य असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल असू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही पाककलेसंबंधी ब्लॉग चालवत असल्यास आणि सुट्ट्यांमधील कुकबुक लाँच करणार असल्यास, तुमच्या सर्व पाककृती व्हेगन असल्याचे किंवा त्या तुमच्या आजीने तयार केल्या असल्याचे हायलाइट करणे अधिक उत्तम असेल.
तुमची कथा आणि विशेष दृष्टिकोन यांबाबत तुम्ही स्पष्ट असल्यावर, त्याबद्दल ऐकण्यात कोणाला स्वारस्य असेल हे तुम्हाला ठरवावे लागेल. या बाबतीत, ते फूड ब्लॉगर, पाककलेसंबंधी साइट किंवा Twitter वरील व्हेगन सेलिब्रिटीदेखील असू शकते. तुमचा प्रेस रिलीझ कुठे पाठवायची याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास, विनामूल्य प्रेस रिलीझ वितरण सेवा शोधण्यासाठी झटपट Google शोध करून पहा.
उत्कृष्ट प्रेस रिलीझ तयार करण्यासाठी महत्त्वाच्या टिपा:
- वाचकाचे/पत्रकाराचे/ब्लॉगरचे लक्ष वेधून घेणारे आकर्षक शीर्षक लिहा.
- मुद्द्यावर या. तुम्ही काय देऊ करता? तुमचे उत्पादन काय करते? ते महत्त्वाचे का आहे?
- तुमच्या कथेसाठी लक्षवेधक दृष्टिकोन किंवा सुरुवात शोधा (उदा. “या सुट्ट्यांच्या मोसमात, पाचपैकी एक ब्रिटिश व्यक्ती त्यांच्या कुटुंबासाठी व्हेगन भोजन बनवेल.”)
- शक्य असल्यास, दीर्घ परिच्छेदांऐवजी झटपट बुलेट पॉइंट वापरा.
PR मोहिमांबाबत सर्वात शेवटी, संयम बाळगण्याचा प्रयत्न करा आणि रात्रभरात परिणाम मिळण्याची अपेक्षा करू नका. तुमच्या कथेने पकड घेण्यापूर्वी बरेच प्रयत्न करावे लागू शकतात आणि तुम्हाला सोयीच्या असलेल्या जागी प्रमुख व्यक्ती कोण आहेत याचा अंदाज घेण्यासाठी व त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल.
आणखी ट्रॅफिक मिळवण्यासाठी तयार आहात का?
यांपैकी कोणत्याही धोरणांची मदत होऊ शकत असली, तरी आम्ही सध्या फक्त एक धोरण निवडण्याची आणि त्यानंतर त्याचा होणारा परिणाम ट्रॅक करण्यासाठी तुमचे साइट विश्लेषण वापरण्याची शिफारस करतो. काही दृष्टिकोनांना इतरांपेक्षा जास्त वेळ लागत असला, तरी तुमच्यासाठी काय काम करते आणि तुमचे प्रेक्षक सर्वाधिक प्रतिसाद कशाला देतात हे तुम्हाला लवकरच दिसेल. तसेच, तुमच्या लक्षात येण्यापूर्वीच, तुम्ही तुमच्या नवीन अतिथींचे तुमच्या साइटवर स्वागत करत असाल आणि तुमची ध्येये साध्य करण्याच्या मार्गावर असाल.