स्रोत

ब्लॉगिंगमधून पैसे कसे मिळवायचे

स्रोत इमेज
सुरुवात करणे

ब्लॉगवरून कमाई करण्याचे बरेच मार्ग आहेत. तुमच्या ब्लॉगवरून पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळी ऑनलाइन कमाई मॉडेल आणि लोकप्रिय धोरणे शोधा.

तुमचा ब्लॉग किंवा साइट असल्यास – किंवा ती सुरू करण्याचा तुमचा विचार असल्यास – त्यांवरून पैसे मिळवणे सुरू करण्यासाठी अजूनही उशीर झालेला नाही. ब्लॉगवरून कमाई करण्याचे बरेच मार्ग आहेत. या लेखामध्ये वेगवेगळी कमाई मॉडेल आणि डिजिटल आशयावरून कमाई करण्यासाठी उपयुक्त ठरणारी लोकप्रिय धोरणे यांचा समावेश आहे.

मूलभूत गोष्टींसोबत सुरुवात करू या. कमाई म्हणजे काय? सोप्या शब्दांत, कमाई म्हणजे तुमच्या साइटवरून पैसे मिळवणे. तुम्ही तुमच्या ब्लॉगवरील ऑनलाइन आशयावरून पैसे मिळवता तेव्हा, त्याला कमाई म्हणतात.

तुमच्या ब्लॉगवरून पैसे मिळवणे सुरू करण्यासाठी, बरीच व्यवसाय मॉडेल आहेत:

  • जाहिराती
  • संबद्ध मार्केटिंग
  • प्रत्यक्ष किंवा डिजिटल उत्पादन ऑफर
  • सदस्यत्वे
  • प्रशिक्षण

तुम्ही हे तुमच्यासाठी आणि तुमच्या ब्लॉगसाठी कसे उपयोगात आणू शकता? प्रत्येक कमाई मॉडेलवर आपण जवळून नजर टाकू या.

जाहिरातींवरून कमाई: पैसे मिळवण्यासाठी तुमच्या ब्लॉगवर जाहिराती देऊ करा

स्रोत एम्बेड केलेली इमेज

ब्लॉगचे प्रकाशक म्हणून, जाहिराती तुमच्या ऑनलाइन आशयासाठी भरीव कमाई प्रवाह पुरवू शकतात. तुमच्या प्रेक्षकांपुढे एक्सपाेजर मिळवण्यासाठी जाहिरातदार पैसे देण्यासाठी तयार असतात. ज्याप्रमाणे मोठा खप असलेले एखादे वृत्तपत्र जाहिरातदारांना जास्त पैसे आकारू शकते, त्याचप्रमाणे तुमची साइट आणि आशय आणखी लोकप्रिय झाल्यावर तुम्ही आणखी कमाई करू शकता.

ज्या व्यवसायांना तुमच्या साइटवर तुमच्या आशयाच्या बाजूला दिसायला हवे आहे अशा व्यवसायांना तुम्ही जाहिरातीसाठी जागा थेट देऊ करू शकता. याला थेट डील असे म्हणतात. तुमच्या वतीने तुमच्या जाहिरातीसाठी जागेची विक्री करण्यासाठी तुम्ही Google AdSense सारखे जाहिरात नेटवर्कदेखील वापरू शकता.

तुमच्या ब्लॉगच्या ठरावीक पेजवर दिसणार्‍या आशयाशी सुसंगत असणार्‍या जाहिराती दाखवून AdSense काम करते. उदाहरणार्थ, तुमचा ब्लॉग साहसी प्रवासाबद्दल असल्यास आणि तुम्ही नुकतीच रेक्याव्हिकच्या प्रवासाबद्दल पोस्ट अपलोड केली असल्यास, AdSense प्रवास विमा, आइसलँड किंवा गरम कपड्यांबद्दल जाहिरात दाखवू शकते. ज्या साइटवर जाहिरात दिसते तिचे मालक म्हणून, वापरकर्त्याने जाहिरात पाहिल्यावर किंवा तिच्याशी परस्परसंवाद साधल्यावर AdSense तुम्हाला पैसे देते.

ऑनलाइन जाहिराती तुमच्या ब्लॉगच्या आशयाशी आणि वाचकवर्गाशी सुसंगत बनवता येण्याच्या क्षमतेमुळे, अनेक जाहिरातदार तुमच्या जाहिरातीसाठीच्या जागेसाठी तुम्हाला प्रीमियम किंमत देण्यास तयार आहेत.

संबद्ध मार्केटिंग: उत्पादन शिफारशींमार्फत उत्पन्न मिळवा

स्रोत एम्बेड केलेली इमेज

संबद्ध मार्केटिंग म्हणजे तुम्ही तुमच्या आशयामध्ये दुसर्‍या साइटवर विक्रीसाठी असलेल्या एखाद्या उत्पादनाची किंवा सेवेची लिंक समाविष्ट करणे. ते अशा प्रकारे काम करते: एखादी व्यक्ती तुमच्या साइटवरील लिंकवर क्लिक केल्यावर, सहयोग्याच्या साइटवर जाऊन तुम्ही समर्थित केलेले उत्पादन खरेदी करत असल्यास, तुम्हाला विक्रीवर कमिशन मिळते.

उत्पादन शिफारशींमध्ये रस असलेल्या लोकांचा प्रतिबद्ध प्रेक्षकवर्ग असलेल्या ब्लॉगसाठी, हे एक व्यवहार्य कमाईचे मॉडेल असू शकते. माहितीपूर्ण, कसे करायचे आणि जीवनशैली लेख सहयोग्यांच्या उत्पादनांचा प्रचार करण्याची भरपूर संधी देऊ करतात.

साहसी प्रवास ब्लॉगचे उदाहरण पुन्हा वापरून, समजा तुम्ही जंगलातील पोहोण्याच्या जागांच्या प्रवासाबद्दल एक स्टोरी पोस्ट केली. तुम्ही तुमच्या प्रवासासाठी सोबत नेलेल्या गीअरची – जसे की स्विमसूट, टॉवेल आणि गॉगल – शिफारस करण्यासाठी संबद्ध मार्केटिंग वापरू शकता. ब्लॉग वाचकाने तुम्ही शिफारस केलेल्या स्विमसूटच्या लिंकवर क्लिक केल्यावर आणि त्यानंतर तो खरेदी केल्यावर, तुम्ही तुमच्या ब्लॉगवरून उत्पन्न जनरेट करता.

तुम्ही तुमच्या प्रेक्षकांचा विश्वास कायम राखता याची खात्री करण्यासाठी, तुमच्या सहयोग्यांशी असलेल्या संबंधांबद्दल पारदर्शक राहण्याचा उद्देश ठेवा. अनेक देशांमध्ये तुमचे सहयोगी संबंध उघड करणे ही कायदेशीर आवश्यकतादेखील आहे, त्यामुळे संबद्ध मार्केटिंगमध्ये सहभागी होण्यापूर्वी कायदा सल्लागारासोबत खात्रीपूर्वक चर्चा करा.   हेदेखील लक्षात ठेवा की तुमच्या ब्लॉगची प्रतिष्ठा तुम्ही प्रचार करत असलेल्या उत्पादनाशी किंवा सेवेशी संबंधित आहे, त्यामुळे तुमचे सहयोगी भागीदार निवडताना गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा.

प्रत्यक्ष किंवा डिजिटल उत्पादन ऑफर: तुमच्या ब्लॉगवरून पैसे मिळवण्यासाठी गोष्टींची विक्री करा

स्रोत एम्बेड केलेली इमेज

अनेक ब्लॉगर त्यांच्या ब्लॉगवरून कमाई करण्याचा मार्ग म्हणून, ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपस्थिती स्थापित करतात, ऑनलाइन स्टोअर तयार करतात आणि उत्पादने विकण्यास सुरुवात करतात. तुमची उत्पादने प्रत्यक्ष किंवा डिजिटल असू शकतात. साहसी प्रवास ब्लॉगच्या उदाहरणामध्ये, तुम्ही तुमचा लोगो दर्शवणार्‍या टीशर्टची किंवा विदेशी गंतव्यस्थानांसाठी मार्गदर्शक पुस्तकांची विक्री करू शकता.

तुमची उत्पादने प्रत्यक्ष असोत किंवा व्हर्च्युअल, तुम्हाला पेमेंट स्वीकारण्यासाठी एक सिस्टम सेट करावी लागेल. प्रत्यक्ष व्यापारी मालाची विक्री करण्यासाठी तुम्हाला तुमचा स्टॉक स्टोअर करणे, शिपिंग व्यवस्थापित करणे आणि कर व जकात हाताळणे यांबद्दल विचार करावा लागेल. लॉजिस्टिकनुसार डिजिटल सामान कमी गुंतागुंतीचे असू शकते कारण ते इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने वितरित केले जाऊ शकते.

सदस्यत्वे : नवीन उत्पन्न प्रवाह जोडण्यासाठी नियमित शुल्क आकारा

स्रोत एम्बेड केलेली इमेज

तुमच्या ब्लॉगवर तुमच्या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेला अ‍ॅक्टिव्ह समुदाय असल्यास, सशुल्क सदस्यत्व मॉडेल हा दीर्घकालीन कमाई जनरेट करण्यासाठी तुमचा मौल्यवान आशय वापरण्याचा दुसरा मार्ग आहे.

या व्यवसाय मॉडेलमध्ये, वाचक नियमित तत्त्वावर, साधारणपणे मासिक किंवा वार्षिक, निश्चित रक्कम देतात. वाचकांकडून या प्रकारे सदस्यत्व शुल्क गोळा करून, तुम्ही आवर्ती उत्पन्न निर्माण करू शकता. या प्रकारचा सातत्यपूर्ण आर्थिक प्रवाह आणखी स्थिर, अनुमान करता येणारा आणि अचूक कमाई प्रवाह देऊ करतो.

त्या बदल्यात, तुम्ही सदस्यांना प्रीमियम आशय, समुदाय भाग, शिकण्याचे स्रोत, व्हिडिओ किंवा अतिरिक्त सेवा आणि टूल देऊ करू शकता. तुमच्या ब्लॉगला अनुकूल होण्यासाठी तुम्ही यांपैकी बरेच घटक एकत्र करू शकता.

प्रशिक्षण: तुमच्या ब्लॉगवरून प्रशिक्षणामार्फत कमाई करा

स्रोत एम्बेड केलेली इमेज

तुमचा ब्लॉग प्रशिक्षण सेवांना वाहून घेतलेला ब्लॉग असल्यास, तुम्ही ऑनलाइन अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण पॅकेज सेट करून आणि त्यांसाठी शुल्क आकारून पैसे मिळवू शकता.

तुम्ही व्हिडिओ किंवा डाउनलोड करता येणारी ई-पुस्तके यांसारखे शिक्षण साहित्य तयार करता तेव्हा, तुम्ही तुमच्या वाचक अथवा प्रेक्षकवर्गाला स्वत:च्या सोयीनुसार पुढे जाण्याची मुभा देता. लोक तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना, तुम्ही अभ्यासक्रमात पुढे येणाऱ्या विषयांमध्ये त्यांना कितपत रस वाटतो आहे हे जाणून घेऊ शकता.

ऑनलाइन अभ्यासक्रम डेव्हलप करण्यासाठी खूप वेळ आणि स्रोतांची आवश्यकता असू शकते, हे प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला प्रतिबद्ध प्रेक्षक लागतील.

तुमची कमाई वाढवण्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे लाइव्ह व्हिडिओ प्रशिक्षण देऊ करणे आणि तुमच्या वेळेच्या मोबदल्यात पैसे घेणे.

तुमची ऑफर ऑनलाइन अभ्यासक्रम किंवा मागणीनुसार प्रशिक्षण यांवर आधारित असली तरीही, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसोबत ईमेलने किंवा खुद्द तुमच्या ब्लॉगमध्ये संवाद साधण्याच्या संधीदेखील समाविष्ट करू शकता.

लक्षात ठेवा, तुमच्या ब्लॉगचा वापर करून पैसे मिळवण्याचे अनेक पर्याय आहेत. तुम्ही ब्लॉगमधून कमाई करण्याचे एक धोरण आत्मसात करू शकता किंवा तुमच्या व्यवसायासाठी कोणते धोरण लागू पडते ते शोधण्यासाठी तुम्ही कितीही संख्येने कमाई प्रवाह वापरून पाहू शकता. तुम्हाला ऑनलाइन कमाईबद्दल अधिक जाणून घेण्यात रस असल्यास, आमच्या ब्लॉग ला भेट द्या.