स्रोत

तुमचा आशय लोकलाइझ केल्याने नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात तुम्हाला कशी मदत होईल

स्रोत इमेज
सर्वोत्तम पद्धती

आशयाला भाषांतर केलेल्या, सांस्कृतिकदृष्ट्या उचित आवृत्त्यांमध्ये लोकलाइझ केल्याने आशय निर्माणकर्त्यांना त्यांचा प्रेक्षकवर्ग वाढवण्यात आणि आणखी मार्केटपर्यंत पोहोचण्यात कशी मदत होऊ शकते ते जाणून घ्या.

आशय निर्माणकर्ता म्हणून तुम्हाला माहीत असेल, की कमाई करण्यासंबंधित महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आशय जास्तीत जास्त प्रेक्षकांकरिता उपयुक्त आणि आकर्षक करणे. तुमचा ब्लॉग इतर मार्केटसाठी किंवा भाषांमध्ये लोकलाइझ करणे हा त्यासाठीचा एक परिणामकारक मार्ग आहे ज्यामुळे तुम्ही अतिरिक्त ट्रॅफिक आकर्षित करण्याकरिता तोच आशय पुन्हा वापरू शकता. लोकलायझेशनमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, त्याने तुम्हाला कशी मदत होऊ शकते आणि तुमच्यासाठी कोणती मार्केट व कोणते प्रेक्षक योग्य आहेत यांविषयी आम्ही या लेखात बोलणार आहोत.

लोकलायझेशन म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे?

लोकलायझेशनमध्ये तुमच्या ब्लॉगचे किंवा इतर आशयाचे नवीन प्रेक्षकांसाठी सांस्कृतिकदृष्ट्या उचित भाषांतर करण्याचा समावेश होतो. यामध्ये बोलीभाषेतील प्रयोग किंवा इतर स्थानिक वाक्प्रचार विचारात घेतले जात असल्यामुळे आणि त्यांचे लक्ष्य भाषेत त्याच अर्थाचे भाषांतर केले जात असल्यामुळे हे नेहमीच्या भाषांतरापेक्षा वेगळे आहे. हे महत्त्वाचे आहे कारण इंग्रजी अजूनही सर्वात लोकप्रिय भाषा असली तरीही, चारपैकी एकच वापरकर्ता ती वापरतो. म्हणजेच, तुम्ही फक्त इंग्रजीत प्रकाशित करत असाल, तर तुम्हाला जगातील ७५% लोकसंख्येपर्यंत पोहोचता येणार नाही.

सुरुवात करणे

तुम्ही लोकलाइझ करण्यास सुरुवात करण्यापूर्वी, जगातील कोणत्या भागात तुमच्या सद्य आशयाची दखल घेतली जाते आणि त्या मार्केटमध्ये कोणत्या भाषा वापरल्या जातात हे तपासा. तुम्ही Google Analytics मध्ये वापरकर्त्यांच्या ब्राउझरच्या भाषेनुसार त्यांना शोधून हे सहजरीत्या करू शकता.

स्रोत एम्बेड केलेली इमेज

लक्ष्य करण्यासाठी नवीन देश शोधल्यानंतरदेखील, त्यांपैकी कोणत्या देशांसाठी लोकलाइझ करावे हे तुम्ही निवडणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, हे हॉलंडमध्ये आवश्यक नाही जेथे ८७% लोक इंग्रजी बोलतात. पण, पोलंडमध्ये ९५% लोक हे त्यांच्या मूळ भाषेतील ऑनलाइन आशयाला प्राधान्य देतात.

तुमची लोकलायझेशनची प्रक्रिया शक्य तितक्या सहजरीत्या पुढे जाण्यात मदत व्हावी यासाठी या टॉप टिपा वापरा.

ऑटो-ट्रान्सलेटर टाळा

ऑनलाइन ट्रान्सलेटर ही रोजच्या वापरासाठी चांगली आहेत, पण ती पुरवतात ती भाषांतरे कदाचित त्या भाषेतील मूळ भाषिकाला अर्थपूर्ण वाटणार नाहीत. यामुळे तुमचा आशय विचित्र किंवा याहीपेक्षा गंभीर म्हणजे, तो अनुचित वाटू शकतो.

स्थानिक व्यक्तीला विचारा

तुमच्यासाठी लोकलायझेशन करण्याकरिता पात्र स्थानिक व्यक्तीला नियुक्त केल्याने तुमची भाषांतरे ही फक्त अचूकच नाहीत तर तुम्हाला ज्यांच्यापर्यंत ती पोहोचवायची आहेत त्यांच्यासाठी सांस्कृतिकदृष्ट्या योग्य आणि अ‍ॅक्सेसिबलदेखील असतील.

एखादे युनिव्हर्सल लँग्वेज सिलेक्टर (ULS) वापरा

यामुळे वापरकर्ते तुमचा ब्लॉग ब्राउझ करत असतील तेव्हा त्यांना त्यांची भाषा कॉंफिगर करण्यासाठी सोपा आणि सुलभ मार्ग मिळतो. यामुळे त्यांना स्थानिकरीत्या फॉंट उपलब्ध नसलेल्या लिपींमधील आशयदेखील वाचता येतो किंवा तुमच्या वेबसाइटच्या मेनूमध्ये वापरलेली भाषादेखील कस्टमाइझ करता येते.

आंतरराष्ट्रीय SEO सर्वोत्तम पद्धतींचे पालन करा

तुमची वेबसाइट ही लवकरच वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि स्थानांवर आशय दाखवणार असल्यामुळे, या SEO सर्वोत्तम पद्धती यांचे नक्की पालन करा. उदाहरणार्थ, तुमच्या साइटची कोणती आवृत्ती दाखवावी हे Google ला कळण्यासाठी hreflang टॅग वापरणे.

हळूहळू प्रगती करा

तुमचा सर्व आशय हा प्रत्येक मार्केटसाठी एकाच वेळी लोकलाइझ करण्याचा मोह आवरा. त्याऐवजी, तुमच्या सर्वात मोठ्या संभाव्य प्रेक्षकवर्गांना आणि तुमच्या सर्वात लोकप्रिय आशयाला प्राधान्य द्या व त्यानुसार पुढील नियोजन करा. AdSense वापरल्यानेदेखील भार हलका करण्यात मदत होऊ शकते कारण ते आपोआप तुमच्या वापरकर्त्यांची भाषा यामध्ये जाहिराती दाखवते.

पुढील पायऱ्या

तुमचा आशय पुन्हा वापरून, तुलनेने कमी वेळेत आणि प्रयत्नांनी नवीन प्रेक्षकांशी जोडले जाण्यासाठी लोकलायझेशन हा उत्तम मार्ग आहे. पण लक्षात ठेवा, की सर्वोत्तम पद्धतींसंबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याने आणि कमी दर्जाचा आशय तयार केल्याने तुमच्या ब्रँडच्या प्रतिमेला हानी पोहोचू शकते व ग्राहक कदाचित तुम्हाला दुसरी संधी देणार नाहीत.

तुम्हाला लोकलायझेशनची चाचणी करणे आणि अंमलबजावणी करणे याविषयी सल्ला हवा असो किंवा तुमच्या आशयाची उपलब्धता नवीन प्रदेशांपर्यंत विस्तारित करणे याविषयी टिपा हव्या असोत, त्यांसाठी मार्केट फाइंडर वेबसाइट वर जा. सुरुवात करण्यासाठी आणि तुमचा नवीन प्रोजेक्ट सहजरीत्या पुढे जाण्यात मदत व्हावी यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली सर्व मार्गदर्शके व स्रोत तेथे मिळतील.