स्रोत

तुमच्या साइटच्या वापरकर्ता प्रतिबद्धतेमध्ये सुधारणा कशी करायची

स्रोत इमेज
सर्वोत्तम पद्धती

तुम्ही व्यवसाय मालक किंवा ब्लॉगर कोणीही असलात तरी, लोकांना इतर कुठेही मिळणार नाही असा उत्कृष्ट आशय, उत्पादने किंवा सेवा देऊ करणे ही तुमच्या वेबसाइटच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे तुम्हाला कळेल.

मात्र, यश मिळवण्यासाठी दुसरा एक महत्त्वाचा घटक लागतो – आणि तो म्हणजे, तुमची साइट लोकांना तिच्याशी सुसंवाद साधण्यासाठी व अंतिमतः तेथे शक्य तितका वेळ घालवण्यासाठी किती चांगल्या प्रकारे प्रोत्साहित करते.

हे ‘वापरकर्ता प्रतिबद्धता’ म्हणून ओळखले जाते. तुम्ही ट्रॅफिकच्या प्रमाणाच्या आधारावर जाहिराती विकत असल्यास, हे विशेष महत्त्वाचे मेट्रिक आहे, कारण तुम्ही जितका जास्त काळ लोकांना तुमच्या आशयामध्ये (आणि तुमच्या जाहिरातींमध्ये) गुंतवून ठेवू शकता, तितकी जास्त कमाई जनरेट करू शकता.

या लेखामध्ये, तुम्हाला तुमच्या वेबसाइटच्या वापरकर्ता प्रतिबद्धता पातळ्या मोजता येण्याचे मार्ग, सुधारणा कशा करायच्या आणि हे करत असताना कोणत्या छुप्या धोक्यांवर लक्ष ठेवायचे हे आपण एक्सप्लोर करू.

वापरकर्ता प्रतिबद्धता महत्त्वाची का आहे आणि ती कशी मोजायची

ज्या प्रकारे लोकप्रिय नसलेले पदार्थ टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यासाठी आणि सर्वाधिक खपणारे पदार्थ कायम ठेवण्यासाठी रेस्टॉरंट त्यांचे मेनू वेळोवेळी अपडेट करत असतात, त्याच प्रकारे वापरकर्त्यांना काय गुंतवून ठेवते, कशाकडे दुर्लक्ष केले जाते आणि लोक बाहेर पडण्याची कारणे काय आहेत हे पाहण्यासाठी, तुम्हीदेखील तुमच्या आशयाचे परीक्षण केले पाहिजे.

तुम्ही हे अनेक प्रकारे मोजू शकता:

  • बाउन्स रेट लिंकवर क्लिक करणे, एखादी गोष्ट खरेदी करणे किंवा फॉर्म भरणे यांसारखी कोणतीही कृती न करता तुमची साइट सोडून जाणार्‍या अतिथींची टक्केवारी.
  • साइटवरील वेळ ‘सेशनचा कालावधी’ म्हणूनदेखील ओळखला जाणारा, एखादी व्यक्ती तुमच्या वेबसाइटवर घालवत असलेला एकूण वेळ.
  • पेजव्ह्यू हे एखादे पेज ब्राउझरमध्ये किती वेळा लोड केले गेले किंवा पाहिले गेले त्याचे वर्णन करते.
  • टिप्पण्या किंवा शेअर यामुळे तुम्हाला तुमचा आशय किती लोकप्रिय आणि रोचक आहे त्याची अंदाजे कल्पना येऊ शकते.
  • परत भेट देणार्‍या अतिथींची टक्केवारी ही तुमच्या वेबसाइटवर ठरावीक कालावधीत आधीच येऊन गेलेल्या आणि त्यानंतर त्याच डिव्हाइसवर तेथे परत आलेल्या वापरकर्त्यांच्या संख्येचे वर्णन करते.

तुमच्या वेबसाइटसाठी ही (आणि इतर) वापरकर्ता प्रतिबद्धता मेट्रिक मोजण्यासाठी, प्रथम तुमच्याकडे साइट विश्लेषण असावे असेल. येथे एक पर्याय Google Analytics आहे, जे सेट करण्यास सोपे आहे आणि Google AdSense सोबत अखंडपणे काम करते.

त्यानंतर, वापरकर्ता प्रतिबद्धतेमध्ये सुधारणा कशी करायची

कोणते सुसंवाद मोजायचे आणि ते कशा प्रकारे करायचे हे आता तुम्हाला माहीत झाल्याने, आपण तुमच्या वापरकर्ता प्रतिबद्धता पातळ्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्हाला उचलता येणारी काही पावले एक्सप्लोर करू या.

  • सिद्धांत आणि चाचणीसह सुरुवात करा उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या पेजव्ह्यू मेट्रिकमध्ये सुधारणा करायची असल्यास, तुम्ही तुमच्या लेखांच्या शेवटी वापरकर्त्यांना आवडू शकेल अशा इतर आशयाकडे नेणार्‍या लिंक जोडून चाचणी घेऊ शकता. त्यानंतर, A/B चाचण्या झटपट सेट करण्यासाठी आणि कोणता आशय, मेसेज किंवा इतर अनुभव ग्राहकांना सर्वाधिक गुंतवून ठेवतात (व आनंद देतात) ते पाहण्यासाठी, तुम्ही Google Optimize यासारखी टूल वापरू शकता.
  • बाउन्स रेटवर लक्ष ठेवा तुमचे विश्लेषण तुमच्या एखाद्या पेजवर खूप ट्रॅफिक, पण जास्त बाउन्स रेट असल्याचे दाखवत असल्यास, आणखी तपास करण्याची गरज असू शकते. उदाहरणार्थ, तुमचे पेज लोड होण्यासाठी लागणारा वेळ तुम्हाला कमी करावा लागू शकतो किंवा तुमचे नेव्हिगेशन सुलभ करावे लागू शकते. तुमच्याकडे लोकांना तुमचा ब्लॉग वाचण्यापासून रोखणारे कोणतेही पॉप-अप आहेत का? तुमच्या साइटवर लँड होताना तुम्ही आवाज आपोआप सुरू केला आहे का? तुमची साइट मोबाइल डिव्हाइसवर वाचण्यासाठी किती सोपी आहे? यासारख्या समस्या तुमच्या बाउन्स रेटवर परिणाम करू शकतात, त्यामुळे प्रत्येक समस्या तपासा, बदलांची पुनःपुन्हा चाचणी घ्या आणि हे करत असताना परिणाम मोजा.
  • तुम्ही बातमी प्रकाशक आहात का? तसे असल्यास, लॉयल्टी तयार करण्यात आणि तुमच्या वापरकर्त्यांबद्दल अधिक चांगला व अचूक डेटा कॅप्चर करण्यात मदत होण्यासाठी, News Consumer Insights वापरून पहा.

लक्ष ठेवण्यासाठी काही गोष्टी

प्रथम उद्योग बेंचमार्क रन करा

तुमच्या साइटच्या वापरकर्ता प्रतिबद्धता पातळ्या मोजण्यापूर्वी, नेहमी तुमच्या विशिष्ट उद्योगाचे बेंचमार्क तपासा. यामुळे तुम्हाला तुमच्या साइटच्या परफॉर्मन्सची तुलना करण्यासाठी मापदंड मिळेल, तुमच्या प्रगतीचा माग ठेवण्यात आणि निराकरण करण्याची गरज असलेली समस्या असताना फ्लॅग करण्यातदेखील तुम्हाला मदत होईल. Google Analytics हे सुरुवात करण्यासाठी चांगले ठिकाण आहे, जेथे तुम्हाला तुमच्या साइटचा बाउन्स रेट आणि परफॉर्मन्ससंबंधी इतर डेटा यांची उद्योगांच्या १६०० पेक्षा जास्त वर्गवार्‍यांशी तुलना करता येते.

बाउन्स रेटचा चुकीचा अर्थ लावू नका

बाउन्स रेट हे उपयुक्त मेट्रिक आहे, पण ते संदर्भासह समजून घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, वापरकर्ता तुमच्या वेबसाइटच्या फक्त एका पेजला भेट देऊन नंतर सोडून जात असल्यास, तुमचा आशय पुरेसा गुंतवून ठेवणारा नाही असे तुम्हाला वाटू शकते. मात्र, त्यांनी भेट दिलेल्या पेजवर दीर्घ स्वरूपातील आशय असल्यास आणि ते तुमच्या साइटवर अनेक मिनिटे किंवा जास्त काळ राहिले असल्यास, हा निष्कर्ष दिशाभूल करणारा असू शकतो. या बाबतीत, तुम्हाला स्क्रोल डेप्थ हे वापरण्यासाठी आणखी चांगले आणि जास्त इनसाइट पुरवणारे मेट्रिक वाटू शकेल.

पेज मेट्रिकवरील वेळेबद्दल सावध रहा

अगदी बाउन्स रेटप्रमाणेच, पेजवरील वेळदेखील थोडीशी दिशाभूल करणारी असू शकते.

या प्रसंगाची कल्पना करा. वापरकर्ता तुमच्या होमपेजवर लँड करतो आणि तुमचे विश्लेषण टूल वेळेची नोंद (उदाहरणार्थ) सकाळी ११:०५ अशी करते. तोच वापरकर्ता तेथे एक मिनिट थांबतो, त्यानंतर क्लिक करून तुमच्या साइटवरील दुसर्‍या पेजवर जातो. पुन्हा, तुमचे विश्लेषण टूल वेळेची नोंद सकाळी ११:०६ अशी करते. तेथे पूर्ण पाच मिनिटे थांबल्यानंतर, वापरकर्ता तुमच्या साइटवरून पूर्णपणे बाहेर पडतो, ज्यामुळे त्याने साइटवर घालवलेला वेळ एकूण बर्‍यापैकी सहा मिनिटे भरतो.

पण समस्या अशी आहे, की जवळपास प्रत्येक विश्लेषण टूल साइटवर घालवलेला एकूण वेळ फक्त एक मिनिट असा चुकीचा रेकॉर्ड करते. असे का होते? कारण ही टूल फक्त तुमच्या स्वतःच्या पेजशी ‘बोलू’ शकतात आणि इतर वेबसाइटवरील पेजशी ‘बोलू’ शकत नाहीत. त्यामुळे वापरकर्ता बाहेर पडून दुसर्‍या साइटवर गेल्यावर, ती नवीन वेबसाइट शेवटच्या पेजवर घालवलेला वेळ मोजण्यासाठी तुम्हाला टाइमस्टँप परत पाठवणार नाही. विश्लेषण टूलच्या दृष्टीने, वापरकर्ता तुमच्या होमपेजवर एक मिनिट थांबला आणि नंतर निघून गेला.

अतिमापन न करण्याचा प्रयत्न करा

वापरकर्ता प्रतिबद्धता पातळ्यांमध्ये सुधारणा करण्याचे ठरवणे हे नक्कीच सकारात्मक पाऊल आहे, पण तुम्ही एकाच वेळी खूप जास्त मेट्रिक मोजण्याचा प्रयत्न न करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या कमाईवर सकारात्मक परिणाम करत असल्याचे दिसणारे एकच मेट्रिक ओळखणे – मग ते तुमच्या साइटवरील वेळ, शेअर, इ. काहीही असो – त्यानंतर बेंचमार्क निश्चित करण्यावर आणि तुम्हाला हव्या असलेल्या परिणामांना चालना देणार्‍या चाचण्या तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे हे बरेच चांगले असते.

तुमच्या साइटचा वापरकर्ता अनुभव, परफॉर्मन्स आणि कमाईची क्षमता यांमध्ये सुधारणा करण्यासंबंधी आणखी स्रोतांसाठी, आमच्या स्रोत विभागावर जा.